Email: gdca83@yahoo.com

Phone: 0240-2402383, 82, 81

GOVERNMENT DENTAL COLLEGE & HOSPITAL

CHHATRAPATI SAMBHAJINAGAR

Affiliated to Maharashtra University of Health Sciences

Recognized by Dental Council of India, New Delhi

Back to top icon

SERVICES

महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना शासनामार्फत व शासनाचे अधिनस्त सर्व सार्वजनिक प्राधिकरणांमार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवा पारदर्शक, गतिमान व निश्चित कालमर्यादेत देण्यासाठी महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 पारित करण्यात आला असून तो दि. 28.04.2015 पासून अमलात आहे. नागरिकांना सुलभ व कालमर्यादेत सेवा मिळण्यात हे त्याचे उद्दिष्ट आहे.

वरीलप्रमाणे अधिसूचित सेवा नागरिकांना दिल्या जात आहेत किंवा नाही यावर देखरेख, समन्वय, नियंत्रण ठेवण्यासाठी व या संदर्भात सुधारणा सुचविण्यासाठी उपरोक्त कायद्यान्वये महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोग गठीत करण्यात आला असून आयोगामध्ये एक मुख्य आयुक्त व सहा आयुक्त कार्यरत आहेत. आयोगाचे मुख्यालय नवीन प्रशासकीय भवन, मंत्रालयासमोर, मुंबई येथे असून सहा विभागातील मुख्यालयाच्या ठिकाणी आयुक्तांची कार्यालये आहेत.

पात्र नागरिकांना विहित वेळेत सेवा न मिळाल्यास अथवा नियमोचित कारणाशिवाय ती नाकारल्यास अशा निर्णयाविरुद्ध संबंधितांवर वरीष्ठकडे प्रथम व द्वितीय अपिल करता येते व तरीही समाधान न झाल्यास आयोगाकडे तृतीय अपिल करता येते. कसूरदार अधिकाऱ्यास प्रतिप्रकरण रु. 5000/- पर्यंत दंड होऊ शकतो. या विभागामार्फत दिल्या जाणाऱ्या अधिसूचित सेवांची यादी सोबतच्या प्रपत्रात दिली आहे.

महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची वेबसाईट खालीलप्रमाणे आहे :- https://aaplesarkar.mahaonline.gov.in

महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम राजपत्र लोकसेवा हक्क कायद्यानुसार अधिसूचित सेवांची यादी आपले सरकार सेवा केंद्रांची यादी
Quick Links Dental Council Of India Medical Education & Drugs Department Medical Education & Research Maharashtra State Dental Council Maharashtra Public Service Commission CET-CELL Maharashtra University Of Health Sciences Indian Council Of Medical Research
Important १७ बाबी सेवा अधिसूचना
Contact Us

Email: gdca83@yahoo.com

Phone: 0240-2402383, 82, 81

Facebook Profile

Flag Counter
© Copyright GDC&H Chhatrapati Sambhajinagar 2024. Designed and Developed by MIT Chhatrapati Sambhajinagar.